- मा. नगरसेवक चंद्रकांत नखातेंकडून आयुक्तांना निर्वाणीचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- रहाटणीत छ. शिवाजी महाराज यांच्या २१ फुटी अश्वारूढ स्मारकाचे लोकार्पण झाले आहे. या ठिकाणी प्रत्येक रविवारी ग्रामस्थ, सर्व शिवभक्त, बजरंग दल, यांच्या वतीने शिववंदना घेतली जाते.
दरम्यान मेघडंबरी व शिवसृष्टी परीसरात अनेक दिवसांपासून समाजकंटक तसेच मद्यपी राडारोडा व कचरा टाकत आहेत. त्यामुळे स्मारकाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. स्मारकाची विटंबना होऊन अनुचित प्रकार घडु शकतो.
या बाबीची दखल घेत मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांची नुकतीच भेट घेतली. परिसरात सुरक्षा ग्रिल, सुरक्षा रक्षक व सीसीटिव्ही कॅमेरे बसवुन स्मारकाचे संरक्षण करण्याची त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. येत्या पंधरा दिवसांत यावर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिला आहे.












