- कोकण खेड युवाशक्तीच्या मागणीला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- कोकणातील गणेशभक्तांना गावी जाता यावे; यासाठी गणेशोत्सव काळात पुणे व मुंबईतून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाव्यात, अशी मागणी होत होती.
कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी पत्राद्वारे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठ्पुरावा केला होता. त्याची दखल घेत विशेष रेल्वे गाड्या पुणे विभागाकडून सोडल्या जाणार आहेत. यावर्षी पुणे विभागाकडून १५, २२ आणि २९ सप्टेंबरला विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०११६९ पुणे – कुडाळ रेल्वे ही (दि. १५, २२ आणि २९ सप्टेंबर) रोजी पुणे स्थानकातून सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. विशेषतः या रेल्वे पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकावर थांबणार आहे. सर्व कोकणवासीयांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण खेड युवाशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे.












