न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवरील ओझर्डे पुलाखाली पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर (दि. २४) रोजी सकाळी ७.१५ च्या सुमारास अज्ञात वाहनावरील अज्ञात वाहन चालकाने त्याचे वाहन हयगयीने, अविचाराने, भरधाव वेगात चालवले. एक्सप्रेस रोडला डांबरी सर्व्हीस रोडच्या कडेला थांबलेला फिर्यादी यांचा चुलतभाऊ चंद्रकांत बबन पारखी (वय ४८ वर्षे रा. ओझर्डे ता. मावळ जि. पुणे) यांना धडक देउन त्यांचा अपघात केला.
अपघातात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. तसेच त्यांच्या मृत्युस कारणीभुत ठरला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी रोहीदास लहु पारखी यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी २५१/२०२३ भा. द. वि. कलम २७९ ३३८ १३४ (अ) (ब),१७७ कलम १८४ ३०४ मोटार वाहन कायदा अन्वये आरोपी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कांबळे पुढील तपास करीत आहेत.












