- तरुणावर कोयत्याने हल्ला; दोघांना वाकड पोलीसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- ”आम्हाला खुन्नस देतो का” असे म्हणत फिर्यादीला दोघा जणांनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी आरोपी क्र. १ याने ‘मादरचोद खतम करुन टाकीन’ असे म्हणत त्याच्याकडील कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारला. परंतु, तो वार फिर्यादीने चुकविला. वार फिर्यादीने चुकविला नसता तर त्यात फिर्यादीचा जीव गेला असता, याची जाणीव असतानासुध्दा आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून ‘तु जर आमच्या विरोधात ‘पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुझा मर्डर करतो’ अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २१) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास थोपटे लॉन्ससमोर, रहाटणी येथे घडली. फिर्यादी सौरभ विकास साठे याने आरोपी १) दिपक मिसाळ (वय २२ वर्ष, रा. रहाटणी फाटा, काळेवाडी), सनी गवारे (वय २२ वर्ष रा देहुरोड पुर्ण पत्ता माहीत नाही) ३) कैलास बन्जारी (वय २१ वर्ष, रा. भाजी मंडई रहाटणी फाटा पुर्ण पत्ता माहीत नाही), ४) आकाश कांबळे (वय २५ वर्षे रा. रामनगर रहाटणी पुणे पुर्ण पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात ८३०/२०२३ भादवि कलम ३०८,३२३, ५०४, ५०६,३४ आर्म अॅक्ट ४ (२५), मपोका क ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र. ३ व ४ अटक आहेत. पोउपनि सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.












