न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर त्यांच्या वाढदिवसा दिवशीच दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी (दि. ४) रात्री साडे नऊच्या सुमारास चिंचवड तानाजीनगर येथे ही घटना घडली.
याबाबत गणेश लोंढे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गणेश घोलप, आकाश घोलप, सुमीत लवे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोंढे हे गुरुवारी रात्री चिंचवड येथे गेले होते. तानाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळ जवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना आडवले, त्यांना मोटारीबाहेर खेचून शस्त्राने वार केले. यामध्ये लोंढे जखमी झाले असून, त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, चिंचवड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.










