- राष्ट्रवादीच्या अडचणीत होणार वाढ
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- पनवेल महापालिकेतील शेकापच्या तीन नगरसेवकांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते के. के. म्हात्रे, शिला भगत, हेमलता रवि गोवारी आणि रवि गोवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
शेकाप हा राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत या ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
घाटाखालील तिन्ही मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे चांगलेच वर्चस्व आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शेकापची आघाडी असल्याने घाटाखालील मतदार संघातुन पार्थ पवार यांना चांगलीच मदत मिळणार होती. आता ३ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.










