- फुगेवाडीत ” मन की बात ” कार्यक्रमास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२३) :- प्रभाग क्रमांक ३० दापोडीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन की बात कार्यक्रम ” या कार्यक्रमाचे आज रविवारी (दि. २७) आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप व पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
शंकर जगताप यांनी आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारत देशाचा मानसन्मान संपूर्ण जगभरात कशाप्रकारे वाढवला व भारत सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत कशा पोहोचवल्या याबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विश्वकर्मा या योजनेचा समाजातील प्रत्येक व्यक्तीला लाभ होईल, त्यासाठी केंद्र सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील असे सांगितले.
तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी देखील मन की बात या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. नरेंद्र मोदी हे आपल्या देशाला एका वेगळ्या नव भारताच्या दिशेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर इस्रो (ISRO) ने चंद्रयान ३ संदर्भात जी कामगिरी केली आहे ती अविस्मरणीय आणि संपूर्ण जगाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली असताना त्याचेही कौतुक संपूर्ण जगभरात होत आहे. आपला देश नवनवीन संकल्पनेतून प्रगती करत असताना संपूर्ण जगभरात भारताचा गौरव वाढत आहे.
या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन सागर फुगे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी सागर फुगे, सुरेश फुगे, मधुकर फुगे, चेतन फुगे, जगदीश घुगे, ओम फुगे, विशाल सातपुते, धर्मेंद्र शिरसागर, रघुनाथ जवळकर, घनश्याम सकट, जयश्री नवगिरे, देवदत्त लांडे, प्रकाश जवळकर, आबा कोळेकर, विशाल वाळुंजकर, मीनाक्षी गायकवाड, उषा वाखारे, प्रतिभा जवळकर, किरण फुगे, वैशाली वाखारे त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रतिभा जवळकर यांनी मांनले.















