न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२३) :- संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राक्षे टोळी, शिंदे टोळी, कांबळे टोळी या तीन टोळ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ” मोका पैटर्न ” नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२३ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील २७ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण २३९ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
१) भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं. ५८० / २०२३ भादंवि ३९७, ३९४, ४२७, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो. का. कलम ३७ (१) सह १३५. क्रि. लॉ. अॅ. अॅक्ट कलम ३ व ७ चे तपासामध्ये आरोपी नामे (१) सुदर्शन ऊर्फ पिल्या संभाजी राक्षे, (टोळी प्रमुख) वय २७ वर्ष, रा. शास्त्री चौक, भोसरी पुणे (२) करण गुरुनाथ राठोड, वय २१ वर्षे, रा. रोडे हॉस्पीटल शेजारी, दिघी रोड, भोसरी पुणे (३) प्रथमेश ऊर्फ पत्या दिलीप कांबळे, वय २० वर्षे, रा. शास्त्री चौक, भोसरी पुणे. (४) विरेंद्र ऊर्फ विन्या विश्वनाथ चव्हाण, वय १९ वर्षे रा. राजा सोयायटी, शास्त्री चौक, भोसरी पुणे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १६ गुन्हे दाखल असून १२ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
२) पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ७०२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४, महा.पो.का. ३७(१) सह १३५ चे तपासामध्ये आरोपी नामे १) अतुल काळूराम शिंदे. (टोळी प्रमुख) वय २२, रा. बौध्द विहार शेजारी, गांधीनगर पिंपरी पुणे (२) रोहन माणिक जाधव, वय १९ वर्षे, रा. बनसाळ गल्ली च्या बाजूला गांधीनगर, पिंपरी पुणे (३) किरण मंगेश बिरादार, वय २१ वर्ष, रा. दत्त मंदीरामागे, मोहननगर, चिंचवड पुणे (४) पवन ससाणे रा. गांधीनगर, पिपरी पुणे (पाहिजे आरोपी) यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गंभीर गुन्हे केल्याची नाद आढळून आलेले आहेत.
३) पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ७२९ / २०२३ भा.द.वि. कलम ३९५, ४२७ या १) अंगद बळीराम कांबळे, (टोळी प्रमुख) वय ३८ वर्ष, रा. राजीव गांधी वसाहत बसतदादा पाटील शाळेचे मागे, नेहरूनगर, पिपरी पुणे २) आकाश शंकर लष्करे, वय २५ वर्ष, रा. बिटकर चाळ, साईबाबा मंदीराशेजारी, नेहरुनगर पिपरी ३) शाहरुख नईम शेख, २६ वर्ष, रा. वसंतदादा पाटील शाळेचे समोर, भोसलेनगर, नेहरुनगर पपरी पुणे (४) दिनेश गोरख माने, वय २९ वर्षे रा. विटकर चाळ, साईबाबा मंदीराशेजारी, नेहरूनगर पिपरी पुणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १० गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेले आहे.
वरील तीनही टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करून अथवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाक दपटशा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी भोसरी, पिंपरी, देहूरोड, दिघी वाकड, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी करणे, पुरावा नष्ट करणे, दुखापत करणे, दरोडयाची तयारी करणे, घरात घुसून मारहाण करणे, खंडणी मागणे, कट रचणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, छळवणुक करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे गाडयांची, सामानाची तोडफोड व जाळपोळ करून नुकसान करणे, असे आपल्या टोळी सदस्यांकडून गुन्हे घडवून आणणे व दहशत निर्माण करणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशांचा भंग करणे, अशा प्रकारेचे गंभीर स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवून टोळी प्रमुखांनी गुन्हे केलेले आहेत.
सदर राक्षे टोळी, शिंदे टोळी व कांबळे टोळी या तीनही संघटीत टोळीतील साथीदार यांनी आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व रहावे व आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदयाकरीता सदरचे गुन्हे केल्याचे दिसून आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii). ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून नमूद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii). ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री कुमार चोबे, मा. पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मैडम, मा. पोलीस उप-आयुक्त (परि-०१) श्री. विवेक पाटील, मा.सपोआ श्री. सतिश कसबे (पिंपरी विभाग), मा.सपोआ श्री. बाळासाहेब कोपनर (गुन्हे- १) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि पी.सी.बी (गुन्हे शाखा), वपोनि भास्कर जाधव, (भोसरी पो स्टे), पोनि श्री. राम राजमाने (पिंपरी पो.स्टे), पोउपनि सुहास खाडे (भोसरी पो.स्टे) तसेच अंमलदार पो. हवा सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकण्या कारभारी, (पी.सी.बी. गुन्हे शाखा), पोउपनि सुहास खाडे, पोहवा राजेंद्र राठोड, पोशि वसंत दळवी (भोसरी पो. स्टे.), सपोफी अनिल गायकवाड, मपोना माया कोल्हे, पो.शि. दत्ताजी कौठेकर (पिंपरी पो.स्टे.) यांचे पथकाने केली आहे.















