न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे विविध सणांची परंपरा जपत प्रजापिता ब्रह्मकुमारी भगिनींच्या उपस्थितीमध्ये नेहरूनगर कोर्टाच्या बाररूम येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या वेळी ब्रह्मकुमारीच्या भगिनींनी वकिलांना राखी बांधून मिठाई व पुस्तक वाटप केले. या वेळी अध्यक्ष, पदाधिकारी व वकील बंधू भगिनी व बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. जयश्री कुटे, सहसचिव मंगेश नढे, ऑडिटर राजेश रणपिसे, सदस्य पवन गायकवाड, प्रशांत बचूटे, नितीन पवार उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या भगिनींचा फुलांच्या कुंड्या देवून सत्कार करण्यात आला.
कोर्टातील बार रूममध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या भगिनी यांनी मेडिटेशनचे महत्त्व सांगितले. त्यामुळे मन शांत व प्रसन्न होते. मेडिटेशनमुळे आजार बरे होतात, असं सांगितलं.












