न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- घरी असताना फिर्यादीला श्रीराम कार रेंटल कंपनीच्या अमित शर्मा नावाच्या इसमाने मोबाईलवरून फोन केला. कार रेंटने देण्याचा बहाणा केला. आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्स अॅपवर http://shriramcarrental.in// ही लिंक पाठविली. त्यामध्ये फिर्यादीची पर्सनल माहिती व क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगत १५० रुपये पाठविण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादीच्या परवानगी शिवाय इंटरनेटच्या माध्यमातून आरोपीने ४३,००० रुपयांचा व्यवहार करून फिर्यादीची एकण रक्कम ४३,१५० रकमेची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १२ /०८/२०२३) रोजी दुपारी १२.०० ते २.३० च्या दरम्यान रा. मंत्रा मॅजिक चिंबळीगाव, चाकणमध्ये घडली.
फिर्यादी आषिश जगन्नाथ बनारसे यांनी आरोपी अमित शर्मा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी २२७/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, माहीती व तंत्रज्ञान अधि. २००५ चे कलम ६६ (क) (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.










![[चिंबळीगांव] :- कार रेंटल कंपनीच्या ठगाने क्रेडीट कार्डद्वारे घातला एकाला आर्थिक गंडा...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/521f28d6-2c77-4a17-996b-36f2794e570b-90x60.jpeg)
![[चिंबळीगांव] :- कार रेंटल कंपनीच्या ठगाने क्रेडीट कार्डद्वारे घातला एकाला आर्थिक गंडा...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-1-1-90x60.jpeg)



