न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- थेरगावातील जिवीका होमीपॅथीक दवाखान्यासमोर (दि. ३१.०८.२०२३) रोजी रात्री ८.०० च्या सुमारास फिर्यादीने गाडी पार्क केली. गाडीत फिर्यादी व फिर्यादीच्या मामाची मुलगी असे दोघे बसले होते. त्यावेळी रोडच्या विरुध्द दिशने एक राखाडी रंगाच्या दुचाकीवरून आरोपी आला.
आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीवर लोखंडी कोयत्याने वार केला. परंतु, तो वार फिर्यादीनी चुकविला. अन्यथा फिर्यादीचा जीव गेला असता, असे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी हा विद्यार्थी आहे.
फिर्यादी दिशांत संतोष तापकीर याने आरोपी अतुल शाम यादव (वय २५ वर्षे रा. तुळजाई कॉलनी, थेरगांव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात आरोपीवर ८६०/२०२३ भा.दं.वि कलम ३०८,५०६ (२) आर्म अॅक्ट कलम ४(२५) सह महा. पोलीस अधिनियम ३७ (१) (३) १३५,फौजदारी प्रक्रिया संहिता क. ३,७ अन्वये गुन्हा दाखल असून आरोपीला अटक केली आहे. पोउपनि माने पुढील तपास करीत आहेत.










![[थेरगाव] :- जिवीका दवाखान्यासमोर विद्यार्थ्यावर खुनी हल्ला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/Rent-a-car-in-udaipur-90x60.jpg)
![[थेरगाव] :- जिवीका दवाखान्यासमोर विद्यार्थ्यावर खुनी हल्ला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-2-1-90x60.jpeg)



