न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- LOUIS VUITTON LI या कंपनीचा आरोपींनी (दि. १) रोजी एकुण ३,८२,००० रुपये किंमतीचा बनावटी माल विक्रीकरीता ठेवला. त्यांनी LOUIS VUITTON[LV) या कंपनीच्या स्वामीत्वाच्या मुळ हक्काचे उल्लंघन केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी फिर्यादी सागर अशोक आबनावे यांनी आरोपी १) जिन्स पॉईंट, सी ब्लॉक, जाधव वडेवाला लेनमध्ये, पिंपरीचे दिपक अशोककुमार सिंग (वय ३० वर्ष रा सोनावणे प्लॉझा, फ्लॅट नं १०८, पिंपरीगांव) या दुकानात, (२) लेजन्ड चॉईस, संजय लायब्ररी गल्ली गुप्तावाले समोर, पिंपरीचे साजीद हैदरअली शेख (वय- २० वर्षे, रा. लेन नं ४, पवना नगर, काळेवाडी) या दुकांनामध्ये, (३) रामा बॅग कंपनी, शॉप नं ८, साई चौकाजवळ, पिंपरीचे हिरानंद खुपचंद गंगवाणी (वय ५९ वर्ष रा प्रेम सागर अर्पाटमेन्ट, फ्लॅट नं ४, उदयम नगर, अजमेरा पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात ९०३ / २०२३ प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७, (सुधारित अधिनियम १९८४ आणि १९९४ ) चे कलम ५१ व ६३ नुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि येळे पुढील तपास करीत आहेत.










![[पिंपरी] :- ब्रांडेड कपड्यांची नक्कल अनं विक्री; पिंपरीत तीन दुकानांवर कारवाई...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-1-1-90x60.jpeg)
![[पिंपरी] :- ब्रांडेड कपड्यांची नक्कल अनं विक्री; पिंपरीत तीन दुकानांवर कारवाई...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-02-at-7.33.23-PM-90x60.jpeg)



