- तलाठ्याची पोलिसात धाव; तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- जमिनीचे मुळ मालक हे स्वतः जिवंत असून ते मयत झाल्याचे भासवून मयत इसमाचा वारसदार म्हणून आरोपींनी वारस नोंदी केल्या. सदरच्या नोंदी आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने केल्या.
आरोपींनी मूळ मालकाचा सर्व्हे नंबर ३२५० त्यावरील प्लॉट २/३७ हा स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता बळकाविण्याच्या दृष्टीने शासन दरबारी खोटी कागदपत्रे, वाटानी घेण्यास भाग पाडुन खोटे पुरावे सादर करून शासनाची व मूळ जमीन मालकाची आरोपींनी फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.२३) पासुन ते आजपावेतो तलाठी ऑफिस, पिंपळे निलख, सांगवी येथे घडली. या प्रकरणी पिंपळे निलखच्या फिर्यादी महिला तलाठी यांनी आरोपी १) नरेश दत्तात्रय देशपांडे (कोंढवा रोड, पुणे), २) संतोष राऊत, ३) महेश रमेश माने (पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी ४६३/२०२३ भादंवि कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१,४७४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.










![[पिंपळे निलख] :- भावाची मालमत्ता बळकावण्यासाठी भावाला जिवंतपणीच मृत भासविले..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-2-1-90x60.jpeg)
![[पिंपळे निलख] :- भावाची मालमत्ता बळकावण्यासाठी भावाला जिवंतपणीच मृत भासविले..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-3-1-90x60.jpeg)



