न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- किरकोळ भांडणाच्या कारणावरुन आरोपीने एकाच्या तोडावर सिंमेटची विट ४ ते ५ वेळा मारून त्याला गंभीर जखमी करीत जिवे ठार मारले आहे. विवेक गणेश पासवान (वय २४ वर्षे) असे मयताचे नाव आहे.
ही घटना (दि. ४) रोजी रात्री १२.३० च्या सुमारास निर्माण माईल स्टोन या साईडवरील बेसमेंन्ट मधील पत्र्याचे रुममध्ये रुणाल गेटवे सोसायटी जवळ, मुंबई पुणे हायवे रोडचा बाजूला, किवळे येथे घडली.
फिर्यादी शिवकुमार घनश्याम प्रजापती यांनी आरोपी दिनेश विलास यादव (अंदाजे वय २० वर्षे रा. निर्माण माईल स्टोन साईडवरील बेसमेंन्ट मधील पत्र्याचे रुम मध्ये मुबई पुणे हायवे जवळ रावेत) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलीस ठाण्यात ३२८/२०२३ भा.दं.वि. कलम ३०२ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे.










![[किवळे]:- किरकोळ भांडणाच्या कारणावरुन मजुराचा खून...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/IMG_8078-90x60.jpg)
![[किवळे]:- किरकोळ भांडणाच्या कारणावरुन मजुराचा खून...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-11-90x60.jpeg)



