न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- फोनद्वारे फिर्यादीच्या आधार कार्डचा वापर करून फिर्यादीला तैवानमध्ये पार्सल पाठविले असल्याचे सांगत साहेबांशी बोला, असे सांगुन दुस-या अज्ञात इसमाने साहेब बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या बँक खात्यावरून बेकायदेशिर व्यवहार होत असल्याचे सांगुन त्या खात्यांची ई.डी.ची चौकशी चालु आहे. सदर चौकशी क्लिअर करण्यासाठी बँक खाते क्र- ०९६३००२१०००१५१८४ यावर ७५,७६७ रुपये, व ९८,७६५ रुपये असे १,७४,५३२ रुपये व आर.टी.जी.एस. २,९९,९९९ रुपये, असे एकूण ४,७४,५३१ रुपये भरायला भाग पाडले. सदरचे पैसे परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०४) रोजी १०.३० च्या सुमारास भुमकर चौक, वाकड या ठिकाणी घडला. फिर्यादी अक्षय संतोष देशपांडे यांनी आरोपी १) मो.क्र. ८४५५०११००६५ यावरील शिवम शर्मा व २) एक अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात ८८२/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४१९ व माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००८ चे कलम ६६ (सी) (डी) नुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि लोहार पुढील तपास करीत आहेत.










![[वाकड] :- ईडीची पिडा टाळण्यासाठी केली लाचेची मागणी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-9-1-90x60.jpeg)
![[वाकड] :- ईडीची पिडा टाळण्यासाठी केली लाचेची मागणी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-6-90x60.jpeg)



