न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- फाल्को ई मोटर्स नावाची कंपनी फिर्यादी पत्नी आणि आरोपी पतीने पार्टनरशिपमध्ये २०११ मध्ये अमेरीका येथे चालु केली. कंपनी ही जाहिरातीमध्ये गुंतवणुक, इलेक्ट्रीक्स मोटार्स तसेच जनरेटर सारख्या उत्पादनांची निर्यात करते. त्यानंतर फाल्को ई मोटर्स कंपनी ३१ ऑगस्ट २०१२ मध्ये एमआयडीसी पिंपरी येथे स्थलांतर केली. त्यामध्ये फिर्यादी व आरोपी क्रं १ यांचे ५०- ५० टक्के शेअर्स होते.
दरम्यान फिर्यादी व आरोपी यांचा घटस्पोट झाला. आरोपी क्रं १ याने स्वत:च्या फायदयाकरीता व्यवसायीक माहिती ही पुरवठादार व क्लाइंट एसियन फलेक्स टेक्नोलॉजीला पुरविली. आरोपीने फाल्को ई मोटर्सच्या शेअर धारकांची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १७/०५/२०२२ ते आजपर्यत) फलक्स टेक्रॉलॉजीज गेट क्रं ३९६, प्लॉट क्रं १२, देहु आळंदी रोड, तळवडे येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी १) पती राकेश किमतीलाल धवन (वय ५५ वर्षे, व्हर्जिना, युएसए), २) सासु यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी ४९६/२०२३ भा.द.वि.क. ४०६, ४२०, १२० (ब) प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कणसे पुढील तपास करीत आहेत.










![[तळवडे]:- व्यवसायिक माहिती त्रयस्थ कंपनीला पुरविणाऱ्या पतीच्या विरोधात पत्नीची पोलिसात धाव...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-6-90x60.jpeg)
![[तळवडे]:- व्यवसायिक माहिती त्रयस्थ कंपनीला पुरविणाऱ्या पतीच्या विरोधात पत्नीची पोलिसात धाव...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/6-90x60.jpg)



