न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- बनावट रबरी शिक्का व बनावट सही करून वैदयकिय प्रमाणपत्र घेण्यासाठी येणा-या कामगारांना खोटे प्रमाणपत्र दिले. फिर्यादी व शासनाची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा फसवणुकीचा प्रकार (दि. १) पुर्वी म्हाळुंगेतील शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे घडला. फिर्यादी डॉ. विकास रामचंद्र साबळे यांनी आरोपी शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, महाळुंगे इंगळे मधिल प्रमाणपत्र देणारा व्यक्ती (नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५४०/२०२३ भा.द.वि.क. ४२०, ४६८, ४६५, ४७३ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि भंडारवाड पुढील तपास करीत आहेत.










![[म्हाळुंगे]:- डॉक्टरचा बनावट शिक्का आणि सहीद्वारे कामगारांना खोट्या प्रमाणपत्राची खैरात...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-11-90x60.jpeg)
![[म्हाळुंगे]:- डॉक्टरचा बनावट शिक्का आणि सहीद्वारे कामगारांना खोट्या प्रमाणपत्राची खैरात...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-1-3-90x60.jpeg)



