न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- टाटा मोटर्स व सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालय, चिंचवड येथे सोनोग्राफी मशीन भेट स्वरुपात देण्यात आली.
या मशीनचा (दि. ४) रोजी सकाळी ११.०० वाजता उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अति. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे श्री. श्याम सिंग, मनपाचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती अनिता कोटलवार टाटा मोटर्स कामगार युनियनचे कार्याध्यक्ष श्री अशोक माने व डॉ. प्रकाश साखळकर, श्री. रोहीत (CSR), मनपाचे जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रुग्णालय प्रमुख जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी यांनी केले.
आपल्या मनोगतात डॉ. गोफणे म्हणाले की, सामाजिक बांधलकीतून रुग्णालयास भेट म्हणुन मिळालेल्या या मशिनचा उपयोग शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना होईल, शहारातील नागरीकांना दर्जेदार आरोग्य सेवा मनपाच्या वैद्यकिय विभागाकडुन पुरविली जाते. मनपाच्या या प्रयत्नांना सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशनमुळे पाठबळ मिळाले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रियंका सर्वज्ञ यांनी गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर गवळी यांनी तर अजय प्रधान मुख्य लिपीक यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.















