न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांची प्रतिनियुक्तीने महापालिकेत तीन वर्षांसाठी बदली करण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश महसूल व वन विभागाचे सह सचिव ज.अ. शेख यांनी जारी केला आहे. तर पालिकेतील सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची ठाण्याला बदली झाल्याने त्यांच्याकडील निवडणूक विभागाचा पदभार शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


















