न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२३) :- महापालिकेचे तालेरा रुग्णालय आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या विशेष पुढाकारातून रस्टन कॉलनीत बुधवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान बालके, गरोदर महिला तसेच इतरांच्या बीपी, शुगर, रक्त तपासण्या मोफत करून औषध उपचार देण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग लाभला.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन संस्थेचे जेष्ठ नागरिक आर.टी.वाघमारे, व अप्पा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. असावरी ढवळे नोडल ऑफिसर – तालेरा रुग्णालय, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नवले, संचालक सुभाष मालुसरे व संतोष सौंदणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुभाष मालुसरे यांनी केली. जसे सरकार आपल्या दारी तसे महापालिका आपल्या दारी अशी संकल्पना त्यांनी मांडली. डॉ. आसावरी ढवळे यांनी आरोग्य विषयी समुपदेशन केले व महिला, लहान बालक आणि जेष्ठ नागरिक यांनी आपल्या आरोग्या कडे लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन संतोष सौंदणकर, सुमित कांबळे, महेश कुंभार, आश्विन मायनाळे, अप्पा राणे, ऋषिकेश प्रभू, अविनाश पवार, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, डॉ. सत्यजित शिराळे, डॉ. अर्पिता पाटील तसेच तालेरा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
रस्टन कॉलनी सोसायटीचे संचालक सुभाष मालुसरे यांनी आभार मानले.















