- उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक दिन साजरा..
- पन्नास शिक्षकांचा सन्मान, हिंदी-मराठी गितांचे सादरिकरण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२३) :- शिक्षकांच्या योगदानामुळेच नवीन पिढ्या घडत असतात. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आदर्श समाज घडत असतो. अशा आदर्श शिक्षकांचे समाजाप्रती असलेले कार्य कायम स्मरणात राहते. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर व्यक्तींच्या मनातील गुरुचे स्थान अढळ असले, अशा शब्दांत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनानिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशन व रोज लॅण्ड म्युझिकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (दि. 5) गायन संगीत कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विविध हिंदी, मराठी चित्रपटातील गीतांचे सादरिकरण झाले. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने 50 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पी. के. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ काटे, वाल्मिक काटे, उत्तम काटे, राजेंद्रनाथ जसवाल, विठाई वाचनालयाचे सदस्य, आनंद हास्य क्लबचे सदस्य, ऑल सिनिअर सिटिझन असोसियशनचे सभासद आदी उपस्थित होते.
सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, समाजाची नाळ शिक्षकांच्या हाती असते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कित्येक पिढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. शिक्षक हे गुरुस्थानी असतात. गुरुचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अलौकीक असते. गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्तीचा वैचारिक विकास होतो. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही क्षणी गुरुचे विस्मरण होणे कदापी शक्य नाही, असेही सौ. भिसे म्हणाल्या.
यावेळी गायक दिलीप दावे, दिलीप सेजपाल, केशवराव मुजुमदार, मंजितसिंह भाटिया, सुरेंद्रकुमार जैन, शत्रुघ्न लाल गुप्ता, इलेश कुमार, राजेश खरडे, ज्योती सेजपाल यांनी बहारदार हिंदी, मराठी गितांचे सादरिकरण केले. शिक्षक व नागरिकांनी गीतांचा मनमुराद आनंद लुटला.















