न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२३) :- आकुर्डी येथे जुन्या पिढीतील राष्ट्रीय कुस्तीगीर ज्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत १९७२ साली कन्याकुमारी येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक मिळवलं होतं. १९७३ साली गांधीनगर गुजरात येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच १९७३ ला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वेळा पुणे शहरातून दोन वेळा नेतृत्व केलं होतं. अकलूज येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनामध्ये ७४ किलो वजन गटात माती विभागात कास्य पदक मिळवलं होतं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आकुर्डी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली.
तसेच राष्ट्रीय कुस्तीगीर कैलासवासी बाळासाहेब उर्फ निवृत्ती नातू काळभोर यांच्या स्मरणार्थ समस्त काळभोर परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा कुस्तीगराला ह्या वर्षीपासून त्यांच्या आठवणीने राष्ट्रीय कुस्तीगीर बाळासाहेब उर्फ निवृत्ती नाथु काळभोर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षीचा हा पुरस्कार महाराष्ट्र केसरी व रुस्तमै हिंद अमोल बुचडे यांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी समस्त आकुर्डीगाव ग्रामस्थ व पाहुणे मंडळी उपस्थित होते.