न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- साईनाथनगर, निगडी येथे विहिरीमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. गुरुवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथनगर येथील विहिरीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ४० ते ४५ वयोगटातील महिलेचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. महिलेची चप्पल विहिरीजवळ मिळून आली. अग्निशमनच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.