- दोन्ही टोळ्यांवर गंभीर स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निदेश दिले आहेत. दरम्यान सन २०२३ मध्ये आजपर्यंत २९ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण २४५ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भोसरीतील गायकवाड आणि आळंदीतील विटकर या दोन टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १) भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं. २९८/२०२३. भादंवि ३९२.३८४.३२३, ५०४, ५०६,३४ या गुन्हयांच्या तपासमध्ये आरोपी टोळी प्रमुख (१) सुमेध ऊर्फ गोटया लहू गायकवाड (रा. सांस्कृतिक भवन शेजारी, सिध्दार्थनगर, दापोडी), (२) अनिकेत ऊर्फ बॉक्सी शिरीष पठारे (वय २४ वर्ष, रा. कमलकुज वार्ड नं. ५, दापोडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील टोळी प्रमुख व त्याचा साथीदार याच्यावर एकूण ०७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
२) दिघी पोलीस ठाणे गुन्हा. रजि.नं. २७८/२०२३ भादंवि ३८४, ३८५, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ४ (२५), महा.पो.का. कलम ३७(१) (३) सह १३५ या गुन्ह्यांच्या तपासामध्ये आरोपी टोळी प्रमुख (१) शाम रवि विटकर, (वय २२ वर्ष रा. साठेनगर, पद्मावती रोड, आळंदी), २) ज्ञानेश्वर सिध्दार्थ बडगे (वय ३० वर्षे रा. साठेनगर, पद्मावती रोड, आळंदी), ३) राकेश सुरेश काळे (वय २३ वर्षे रा. भगवान गडाशेजारी, अण्णाभाऊ साठेनगर, आळंदी देवाची), ४) अजय किसन देवरस (वय २३ वर्षे रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी देवाची) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ९ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
वरील दोन्ही टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यासाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतः चे गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर केला. अथवा हिंसाचाराची धमकी देवून किवा धाकपटशा दाखवून टोळीप्रमुख व साथीदार यांनी भोसरी, दिघी, आळंदी, सांगवी, चतुःशृंगी, फरासखाना, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, दरोडा, दुखापत करणे, पुरावा नष्ट करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशिररित्या घातक शस्त्र व घातक हत्यारे जवळ बाळगणे, बेकायदेशिररित्या जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशाचा भंग करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वर्चस्व, आर्थिक फायदा, जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवून या टोळीप्रमुखांनी गुन्हे केलेले आहेत.
गायकवाड टोळी, विटकर टोळी या दोन्ही संघटीत टोळीतील साथीदारांनी आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व कायम रहावे व आर्थिक मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदयाकरीता सदरचे गुन्हे केल्याचे दिसून आल्याने तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला. सदर प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (परि-०१) विवेक पाटील, सपोआ बाळासाहेब कोपनर (गुन्हे-१), सपोआ सतिश कसबे (पिंपरी विभाग), सपोआ राजेंद्रसिंग गौर (चाकण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि पी.सी.बी (गुन्हे शाखा), वपोनि भास्कर जाधव, (भोसरी पो.स्टे), वपोनि श्री. मच्छिंद्र पंडित (दिघी पो.स्टे), पोउपनि बालाजी जोनापल्ले (भोसरी पो.स्टे) पोउपनि सुनिल भदाने (दिघी पो.स्टे) तसेच अंमलदार पोहवा सचिन चव्हाण, पो. हवा. व्यंकप्पा कारभारी, (पी.सी. बी. गुन्हे शाखा), पोहवा राजेंद्र राठोड, पोशि वसंत दळवी, चेतन साळवे (भोसरी पो. स्टे.), पोहवा किशोर कांबळे, पोशि वैभव काकडे (दिघी पो.स्टे.) यांच्या पथकाने केली आहे.















