- दोन राजस्थानी तरुणांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- राजस्थान येथुन मेफेड्रॉन (एम.डी.) व अफु (पॉपी स्ट्रॉ / डुडा) ची आंतरराज्यीय तस्करी करुन अवैधरीत्या आय.टी. पार्क, हिंजवडी येथे विक्री करण्याकरीता आलेल्या दोन राजस्थानी इसमांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे.
१) रविप्रकाश सुखराम बिष्णोई (वय ३७ वर्षे रा. बावधन खुर्द, पुणे; मुळगाव सदरी ता. लोहावट जि. फलोदी राज्य राजस्थान), २) सुरेशकुमार साईराम बिष्णोई (वय ३० वर्षे रा. वडकीनाला, हडपसर, मुळगाव हेमंतनगर ता. लोहावट जि. फलोदी राज्य राजस्थान) असे अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबई-बँगलोर हायवे, पै. तानाजी बबनराव दगडे पाटील कामानीजवळ व पुतळ्याजवळ, बावधन येथे दोन इसम हे अवैध मेफेड्रॉन (एम.डी.) व अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ / डुडा) हा अंमली पदार्थाची विक्री करीता येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी छापा कारवाई केली. कामानीसमोर मोकळ्या जागेमध्ये आरोपी दोन इसम कोणाची तरी वाट पाहत थांबले होते. त्यांच्या हालचाली पाहुन हेच ते इसम असल्याचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एकाच्या ताब्यात १ किलो ७०५ ग्रॅम अफुचा चुराची (पॉपी स्ट्रॉ / डुडा) तर दुसऱ्याच्या ताब्यात ६१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) मिळुन आले.
दोघांकडुन एकुण ३,३९,५७५ रु. किं.चा मुद्देमाल ज्यामध्ये ६१ मेफेड्रॉन (एम.डी.), १ किलो ७०५ अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा), व ०२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे मिळुन आलेला मेफेड्रॉन (एम.डी.) व अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा) हा अंमली पदार्थ त्यांचा राजस्थानमधील साथिदार सोनु जालोरा याचेकडुन आणला असुन ते हिंजवडीमध्ये असणारा त्यांचा साथिदार जयप्रकाश बिष्णोई (रा. हिंजवडी) याला विक्री करणार असल्याचे दोघांनी सांगितले. त्या चौघाविरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क), १५ (ब), २२ (क) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप निरीक्षक राजन महाडीक, ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, मितेश यादव, मयुर वाडकर, संतोष भालेराव, रणधीर माने, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, पांडुरंग फुंदे, नागेश माळी, मारुती जायभाये, तानाजी पानसरे यांचे पथकाने केली आहे.















