न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- आपसात संगणमत करुन फिर्यादी यांना विश्वासात घेतले. नवीन कार कमी किंमतीत मिळवुन देतो, असे अमीष दाखवले. त्यापोटी फिर्यादीकडून ११,००,००० रुपये आरोपी यांनी घेतले. फिर्यादीला दुस-याच्या नावावरील म्हणजे आरोपी क्रं १ याचा मित्र आरोपी क्रं ३ याच्या नावावर एचडीएफसी बँकेच्या लोनवरील कार दिली. नंतर कारचे लोन फिर्यादी यांनी दिलेल्या रक्कमेतून निल करुन सदर कार फिर्यादीच्या नावावर करुन देतो, असे विश्वासात घेवुन सांगितले.
कारचे ४ ते ५ हफ्ते न भरता नंतर हफ्ते थकविले. त्यामुळे सदर कार बँकेने जमा करुन घेतली. त्यामुळे आरोपी यांनी फिर्यादी यांची एकुण ११ लाख रुपयांची फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १२ ऑक्टो २०२० ते आजपर्यंत) कावेरीनगर पोलीस लाईन, वाकड, १६ नंबर बसस्टॉप, बेलठिकानगर, थेरगाव तसेच पुनावळे येथे घडला.
फिर्यादी सचिन शाहु शिखरे यांनी आरोपी १) अनिल चौधरी, २) त्याची पत्नी ३) मंजित कुमार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात ८९३/२०२३ भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पाटील तपास करीत आहेत.










![[थेरगाव]:- 'नवीन कार कमी किंमतीत मिळवुन देतो'...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/62a88f9293fb8-90x60.jpg)
![[थेरगाव]:- 'नवीन कार कमी किंमतीत मिळवुन देतो'...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-09-at-6.33.58-PM-90x60.jpeg)



