न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- दुकानात आलेली महिला आणि आणखी एकाने त्यांची खोटी माहिती, खोटा मोबाईल नंबर फिर्यादी दुकानदाराला दिला. खरेदी केलेल्या कपड्यांचे ७,७०० रुपये व फिर्यादीकडुन त्या व्यतीरिक्त ३,३०० रुपये रोख घेवुन फिर्यादी यांना बनावट अॅप्लिकेशनद्वारे पैसे पाठविल्याचे भासवले. फिर्यादीची एकूण अकरा हजार रुपयांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भवानी कलेक्शन, नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली. फिर्यादी दिलीपकुमार थानारामजी माली यांनी आरोपी अज्ञात एक महिला व पुरुष पैकी निष्पन्न आरोपी गणेश शंकर बोरसे (वय ३४ वर्षे रा. लोहगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ८९५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ डी नुसार दोघांवर गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. पोउपनि रायकर पुढील तपास करीत आहेत.










![[रहाटणी]:- बनावट अॅप्लिकेशनद्वारे पैसे पाठविल्याचा संदेश दाखवीत दुकानदाराची फसवणूक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-14-90x60.jpeg)
![[रहाटणी]:- बनावट अॅप्लिकेशनद्वारे पैसे पाठविल्याचा संदेश दाखवीत दुकानदाराची फसवणूक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-2-4-90x60.jpeg)



