न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- महापालिकेच्या मालकीच्या रेन ट्री या झाडावर साईनाथ टेक्नीकल इन्टीटयुट नावाचा जाहीरातीचा फलक खिळयाच्या साहाय्याने ठोकुन लावला होता. तसेच निलगीरीच्या झाडावरसुद्धा योध्दा अकॅडमी नावाचा जाहीरातीचा बोर्ड खिळयाच्या साहाय्याने ठोकुन लावुन झाडांचे नुकसान करुन मनपाचे मालमत्तेचे विद्रुपीकरण केले.
ही घटना (दि. ५) रोजी ११.३० वा.च्या सुमारास श्रीराम कॉलनी अशिर्वाद कॉलनी सेक्टर १० आणि एफ-२, प्लॉट नं. ४९ एमआयडीसी भोसरी येथे निदर्शनास आली. फिर्यादी सुहास एकनाथ सामसे (उद्यान सहायक पिंपरी चिंचवड मनपा) यांनी आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ४०६/२०२३ महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चेकलम १५ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोहवा फावडे पुढील तपास करीत आहेत.