न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- पार्ट टाईम जॉब आहे. यु ट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करुन ग्रुप वेलफेअर टास्क पुर्ण करुन जास्तीचा परतावा देण्याचे आमिष आरोपींनी फिर्यादीला दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करुन पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावरून आय.एफ.सी. कोडवर पैसे भरण्यास सांगुन फिर्यादींची एकुण ३,६५,००० रुपये रकमेची आर्थिक फसवणुक करुन पैशांचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २३/०८/२०२३ ते दि.१३/०९/२०२३) रोजी फिर्यादीच्या घरात ऑनलाईन माध्यमातुन घडला. महिला फिर्यादी यांनी आरोपी १) अनोळखी मोबाईल नंबर ९५९९६०५१८१, २) टेलीग्राम आय.डी @Q६०८८०५३३७५५ धारक महिला संध्या देवी, ३) टेलीग्राम आय.डी @parekh ६०८८० धारक इसम पारेख यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
रावेत पोलीस ठाण्यात ३३५/२०२३ भा.द.वि.स.कलम ४२०, ४०६, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वपोनि गवारे पुढील तपास करीत आहेत.