न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- दोन श्वान शहर पोलीस दलात दाखल झाले आहेत. ‘सिम्बा’ आणि ‘जेम्स’ अशी त्यांची नावे आहेत. ‘सिम्बा’ हा गुन्ह्यांशी निगडीत काम करणार आहे. चोरी, घरफोडी, खून यांसारख्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन आरोपींचा माग काढणे, हे त्याचे मुख्य काम असणार आहे.
तर, ‘जेम्स’ हा श्वान बॉम्ब शोधक नाशक पथकात (बीडीडीएस) काम करणार आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांचा आहार, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे प्रशिक्षक घेणार आहेत.