- किवळेतील निर्माण ग्रुपच्या साईटवर घडली होती घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुपच्या साईटवर मिञाचा खुन करणारा आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. रावेत पोलीस स्टेशन हद्दीत (दि. ४) रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याच्या रुममध्ये आरोपी दिनेश रामविलास यादव (वय २१ वर्षे, रा. रावेत; मूळ राज्य उत्तरप्रदेश) याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरून तोंडावर सिंमेटची वीट ३ ते ४ वेळा मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे.
या घटनेबाबत शिवकुमार घनश्याम प्रजापती (वय १९ वर्षे) यांनी फिर्याद दिल्याने रावेत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२८/२०२३ भा. द. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी हा पळुन गेला होता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी दिनेश हा गुन्हा केल्यानंतर गेलेल्या मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले. यामध्ये आरोपी हा सेंट्रल चौक, देहुरोड येथून एका टॅम्पोमध्ये बसुन मुंबई बाजुकडे गेल्याचे पोलिसांना दिसुन आले. त्यानंतर आरोपी याचे मित्र व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करीत असताना (दि. ७) रोजी सपोनि पी. आर. शिकलगार यांना गोपनीय माहिती मिळाली. सदर आरोपी शिवाजी चौक, कल्याण येथे आहे. अशी माहिती प्राप्त होताच रावेत पोलीस स्टेशन तपास पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने पकडून रावेत पोलीस स्टेशन येथे आणले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त परदेशी, पोलीस उप-आयुक्त काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त पदमाकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / पी आर शिकलगार, सपोनि / विशाल जाधव, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोहवा / ४२५ कोळगे, पोहवा / ६७५ गायकवाड, पोशि/ नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार बाकडे, रमेश ब्राम्हण, संतोष धवडे व मपोना धाकडे यांनी केली आहे.















