न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- अॅक्टीव्हा मोपेडवर फिर्यादी हे साक्षीदारासह मेडिकलमधून गोळी आणण्यासाठी जात होते. यातील आरोपी क्रं. २ व ३ यांनी त्यांच्या स्प्लेंडरवर येऊन फिर्यादी यांना कट मारला. फिर्यादी हे थांबल्यावर त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. नंतर आरोपी क्रं. १ आल्यावर तीघांनी मिळून शिवीगाळ करून फिर्यादीला हाताने मारहाण केली.
त्यावेळी आरोपी क्रं. १ याने सिमेंटचा गट्टू उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने फिर्यादी जखमी झाले. त्यांच्या तोंडावर डाव्या डोळ्याच्या बाजूला फॅक्चर झाले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. ११) रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास बौद्ध विहारासमोर, रिव्हर रोड, पिंपरी येथे सार्वजनिक रोडवर घडला.
फिर्यादी रुषभ बापु भोगील याने आरोपी १) सनी प्रधान, २) किशोर प्रधान, ३) मोन्या शिंदे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ९२८ / २०२३, भा.द.वि. कलम ३२५, ३२३, ५०४, ३४ अन्वये नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोफो नायडु पुढील तपास करीत आहेत.










![[पिंपरी]:- गाडीला कट मारूनही त्यांचीच दादागिरी; फॅक्चर होईपर्यंत एकाला मारहाण...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/fe413eb3-d1a0-4cf0-a82c-3790aa10fa4b-90x60.jpeg)
![[पिंपरी]:- गाडीला कट मारूनही त्यांचीच दादागिरी; फॅक्चर होईपर्यंत एकाला मारहाण...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/hero-honda-cd-100-90x60.jpg)



