- मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सूचनेची दखल; नागरिकांकडून समाधान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- पिंपळे सौदागर प्रभागातील झिंजुर्डे मळा परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
परिसरातील समस्या मार्गी लागत नसल्यामुळे मा. नगरसेवक शत्रुघ्न यांनी महापालिकेतील स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्या मार्गी लावण्याबाबत तंबी दिली होती.
मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आज अखेरीस मनपा प्रशासनाने झिंजुर्डे मळा परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शत्रुघ्न काटे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद देत उपाययोजना केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
















