न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- ‘तांबे व पितळीच्या भांड्यांना उजाला पावडरने स्वच्छ करुन देतो’ असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोने देखील स्वच्छ करुन देतो’ असे म्हणत सोने स्वच्छ करुन न देता हातचलाखी करीत सोन्याचे दागिणे दोन अनोळखी आरोपींनी चोरुन नेत फिर्यादीची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
ही घटना (दि. १५) रोजी दुपारी १.०० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी गोखले पार्क, चिंचवडगांव येथे घडली. फिर्यादी अरुण दत्तात्रय धर्माधिकारी यांनी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात ४५४/२०२३ भा.दं. वि. कलम ४१७,४२०,३४ प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि रणवरे पुढील तपास करीत आहेत.