न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी कामठे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कामठे हे २०१७ मध्ये भाजपकडून महापालिकेवर निवडून आले होते.













