- पतीची पोलीसात धाव; पत्नी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- घरामध्ये फिर्यादी व त्यांची आरोपी पत्नी गप्पा मारत बसलेले होते. आरोपी पत्नीला फिर्यादीने पाय हलवु नको; असे सांगीतले. ‘मी पाय न हालवता बसु शकतो, असे फिर्यादी तिला म्हणाले. आरोपी हिने ‘मी तुमचे पाय बांधते, तुम्ही तसे बसुन दाखवा’ असे म्हणाली. त्यावर फिर्यादी यांनी होकार दिल्यानंतर आरोपी हिने फिर्यादीचे पाय, हात रस्सीने बांधले. तसेच चेह-यावर चिकट टेप लावुन कपडयाने डोळे झाकुन फिर्यादीच्या छातीवर बसुन कुठुन तरी आणलेला चाकु फिर्यादी यांच्या गळ्यावर व हातावर मारुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी ११.३० च्या सुमारास महात्मा फुलेनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे फिर्यादी यांच्या रहात्या घरात घडला. फिर्यादी विजयसिंह शहाजी गायकवाड यांनी आरोपी महिला हिच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी ७४९ / २०२३, भा.दं.वि. कलम ३०७ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली आहे. पोउपनि भवारी पुढील तपास करीत आहेत.