न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काळेवाडी तसेच चाकण येथील मेदनकरवाडी आणि आळंदीतील वडगाव घेनंद परिसरात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वाहन चालकांनी वाहनं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, बेदरकारपणे, निष्काळजीपणे चालवून अपघात केला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर दोघेजन गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूमध्ये स्वतः चालकाचा देखील समावेश आहे.
पहिली अपघाताची घटना (दि. १६) रोजी सायंकाळी ७.१५ वा. च्या सुमारास काळेवाडतील रागा पॅलेसच्या समोर बी.आर.टी. रोडमध्ये घडली. रस्ता पायी क्रॉस करुन पाटीलवाडा हॉटेलकडुन रागा पॅलेसकडे येत असताना यमाहा वरील चालकाने पादचारी इसमाला धडक दिली. अपघातामध्ये डोक्याला, तोंडाला व अंगावर इतर ठिकाणी गंभीर दुखापती होवुन पादचारी इसमाचा मृत्यु झाला. आरोपी त्यांच्या मृत्यूस आणि स्वतःच्या दुखापतीस आणि गाडीच्या नुकसानीस कारणीभुत झाला आहे. महीलेने आरोपी अरविंद देवराम आरगडे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात पोलिसांनी ९१२/२०२३ भा.द.वि.क. ३०४(अ), २७९, ४२७ सह मो. वा. का. क. १८४, ११९,१७७ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि नाईक निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.
दुसरी घटना (दि. १७) रोजी दुपारी ३.३० वा.च्या सुमारास तुलीप सोसायटी, चाकण शिक्रापुर रोड, मेदनकरवाडी येथे घडली. मयत दुचाकीस्वार हे मेदनकरवाडी येथुन कडाचीवाडीकडे चाकण शिक्रापुर रोडने जात होते. शिक्रापुर बाजुकडुन चाकण बाजुकडे येणाऱ्या टेम्पोवरील चालकाने दुचाकीला उजव्या बाजुने धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गंभिर जखमी झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी अपघाताची माहिती न देता निघून गेला. दुचाकीस्वार इसमाच्या मरणास कारणीभुत झाला आहे. फिर्यादी काळुराम आनंदा खांडेभराड यांनी टेम्पोवरील चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ७३५/२०२३ भा.दं.वि.क. ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, मो. वा. का. क १८४,१३४/१७७ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि डेरे तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत आरोपी दुचाकीस्वार हा त्याची पत्नी दोन मुलांसोबत शेलगाव वरून घरी गोलेगाव पिंपळगाव येथे जात होता. वडगाव घेनंद गावच्या पढे वळणावर दुचाकी स्लिप होवून रोडच्या बाजूस असलेल्या चारीत जावून अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार आरोपीच्या डोक्यास, पायास मार लागून तो (दि.२४/०८/२०२३ रोजी दुपारी ३.३३ वा.) मयत झाला. त्याची मोठ्या मुलगी किरकोळ जखमी झाली. दुचाकीचे नुकसान करण्यास आणि स्वतःच्या मूत्युस व मुलगी गंभीर जखमी होण्यास मयत आरोपी कारणीभूत झाला आहे. संजय कुंडलिक लांडगे यांनी आरोपी किरण दगडु साळवे (मयत) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी २४६ / २०२३ भा.द.वि.क २७९,३०४ (अ), ३३८ मो वा का कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मपोउपनि माने तपास करीत आहेत.