- एकाचवेळी ३९४ पोलिस अंमलदारांना मिळाली पदोन्नती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील ३९४ पोलिस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पदोन्नती झाल्याने पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पोलिस दलात २५ मे २००४ पूर्वी रुजू झालेल्या अंमलदारांना यावर्षी सेवा ज्येष्ठतेनुसार बढती देण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार ३९० जणांना पोलिस शिपाई आणि नाईक पदावरून हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. तसेच, पोलिस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण करणारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या चार अंमलदारांना श्रेणी पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती दिली आहे.
यामध्ये मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोज बनसोड, ज्ञानेश्वर पोटे, वाहतूक शाखेतील गजेंद्र जाधवर आणि वाकड पोलिस ठाण्यातील अरुण भालेराव यांचा सहभाग आहे.