न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२३) :- पत्नीची तब्बेत अचानक बिघडल्याने तीला पाहण्यासाठी बीआरटी बसस्टॉप येथे सिक्युरीटी गार्ड म्हणुन नोकरीस असलेले फिर्यादी घरी गेले.
त्या दरम्यान बीआरटी बसस्टॉप, च-होली फाटा, चोविसावाडी, येथील बसस्टॉपमधील २०,००० रुपये किंमतीचे अॅल्युमिनीयम फ्रेम असलेले ८ दरवाजे व १०,००० रु. किंमतीच्या अॅल्युमिनीयमच्या पटया अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्या आहेत, अशी फिर्याद सेक्युरीटी गार्ड स्वप्नील तापकीर यांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
दिघी पोलिसांनी ४३८/२०२३ भादवी कलम ३७९ नुसार अज्ञात चोरटा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.