- नगरसचिव उल्हास जगताप यांची तिसऱ्या अति. आयुक्तपदी निवड कायम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२३) :- राज्य सरकारने १ सप्टेंबर २०१४ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतिबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते.
महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.
दरम्यान महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठीच्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची निवड कायम करण्यात आली आहे. त्यांच्याकडे १९ फेब्रुवारी २०२१ पासून प्रभारी पदभार होता. आता शासनाने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.

















