न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२३) :- काही एक अधिकार नसताना ‘म्हाडाचे घर मिळवुन देतो’ असे म्हणत तसा अर्जदार यांना करारनामा करुन दिला. अर्जदार यांचा विश्वास संपादन करुन अर्जदाराकडुन ३,००,००० रुपये अनाधिकारे प्राप्त केले.
त्याबाबत अर्जदार यांनी वारंवार मागणी केली असता फक्त १,००,००० रुपये परत देत उर्वरित २,००,००० रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांची फसवणुक करुन अर्जदार यांनी दिलेल्या रकमेचा अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि २४/०६/२०२२ रोजी ते आजतागायत) पिंपरी येथे घडला. फिर्यादी जितेंद्र नामदेव कांबळे यांनी आरोपी १) उमाकांत रामदास ढाके, २) शुभम उमाकांत ढाके यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. पिंपरी पोलिसांनी दोघांच्या विरोधात ९७१ / २०२३ भा.द.वि. कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पलांडे पुढील तपास करीत आहेत.













