- मंडळाच्या तब्बल २१ लोकांच्या टोळीकडून नकोसे कृत्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२३) :- काही दिवसांपुर्वीच फिर्यादी यांचा मुलगा मयत झाला होता. त्यामुळे ‘घरासमोर डिजे वाजु नका; पुढे जावुन वाजवा’ अशी आर्जव फिर्यादीने गणेश मंडळाच्या लोकांकडे केली होती. याचा राग आल्याने गणपती विसर्जन करुन परत घरी जात असताना फिर्यादीच्या ओळखीच्या आरोपींनी फिर्यादीसह त्यांचा मित्र, भाऊ, त्यांची आई, वडिल आणि ड्रायव्हर यांना कांठ्यानी, कोयत्यांनी, लोखंडी सळईने व लाथाबुक्यांनी मारहाण करून घरावर हल्ला केला. त्यांना गंभीररित्या जखमी केले. तसेच आजुबाजुच्या लोकांवर दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२५) रोजी रात्री ११.०० वाजता शिंदे वस्ती, गणेश नगर, सोमाटणे फाटा, ता. मावळ जि. पुणे येथे घडला. फिर्यादी सुनिल प्रभाकर शिंदे यांनी आरोपी १) सुनिल बंदा रजपुत, २) मुकेश करसन रजपुत, ३) रवी करसन रजपुत, ४) सनी करसन रजपुत, ५) प्रविण करसन रजपुत, ६) अक्षय ज्ञानेश्वर काकडे, ७) अतुल वेलसी रजपुत, ८) कृष्णा बलभीम खराते, ९) रवी हिरा रजपुत, १० ) संदीप रमेश रजपुत, ११) विशाल काळुराम रजपुत, १२) संतोष काळुराम रजपुत, १३) विलास हिरा रजपुत, १४) अनिल हिम्मत रजपुत, १५ ) करसन जयंती रजपुत, १६) दिपक हिम्मत रजपुत, १७) आकाश अशोक रजपुत, १८) काळुराम भिका रजपुत, १९) वसंत भिका रजपुत, २०) अमित वेलसी रजपुत, २१) रमेश जयंती रजपुत यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ५०९ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२३, १४७, १४८, १४९, ४५२, ५०४ ५०६, सह आर्म अँक्ट कलम ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, ३७ (१), सह फौजदारी सुधारीत कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे. सपोनि वाघ पुढील तपास करीत आहेत.













