चिंचवडगावात गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडपाच्या उभारणीला वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 28 सप्टेंबर 2023) :- गेल्या दहा दिवसांपासून उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाची आज गुरुवारी (दि. 28) रोजी दिमाखदार विसर्जन मिरवणुक सोहळ्याने सांगता होत आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे.
चिंचवडगावातील चाफेकर चौकात शहरातील गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडपाची उभारणी तसेच फोकस आणि भोंगे असणार्या टाॅवरची देखील प्रशासनाकडून उभारणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिंचवड पोलीस स्टेशनच्या वतीने ‘गणेशोत्सव मोरया पुरस्कार, समिती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत!. असा आशयाचा फलक सभामंडपात लावण्यात आलेला आहे. विसर्जन मिरवणुक सोहळ्यास सायंकाळच्या सुमारास प्रारंभ होईल.

















