- कुठे घडली घटना? वाचा सविस्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 28 सप्टेंबर 2023) :- तळेगाव नगरपरिषद येथे आरोपी नरेंद्र अणंतराव कणसे हे अकाउटंट म्हणुन काम करतात. त्यांना फिर्यादी यांनी कोविड काळात केलेल्या कामाचे बील काढण्यास सांगीतले होते. त्यावर आरोपी यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली.
बिलाचा मोबदला म्हणुन व सदयस्थितीमध्ये गॅस दाह वाहिनीची प्रलंबीत असलेली बिले काढणेण्यासाठी आरोपीने स्वःतकरीता ५,००० रुपये तसेच त्यांचे वरीष्ठ अधिकारी यांच्याकरीता लाचेची मागणी करुन लाच रक्कम घेण्याचे मान्य केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ०१) रोजी दुपारी दोन ते सायं. पाच वाजेच्या दरम्यान तळेगाव नगरपरिषद कार्यालय परसरामध्ये तक्रादार यांच्या चारचाकी वाहनामध्ये पडताळणी कारवाई दरम्यान उघडकीस आली.
याप्रकरणात फिर्यादी शांताराम निगडकर यांनी आरोपी अकाउटंट नरेंद्र अणंतराव कणसे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ५१२/२०२३ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधि १९८८ चे कलम ७,७(अ) अन्वये गुन्हा दाखल आहे. प्रसाद लोणारे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. पुणे पुढील तपास करीत आहेत.