न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- कंपनीच्या कामासाठी दुचाकीवरून फिर्यादी यांचा भाऊ जात होता. त्यावेळी समोरून येणा-या कंटेनरवरील चालक आरोपी याने त्याच्या ताब्यातील कंटेनर वाहन हे रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने, निष्काळजीपणे चालवले.
४४ वर्षीय फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीला कंटेनरची पुढील बाजुची धडक बसुन अपघात झाला. अपघातात फिर्यादीच्या दुचाकीस्वार भावाच्या डोक्यास गंभीर दुखापत करून आरोपी कंटेनर चालक फिर्यादीच्या भावाच्या मरणास कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि २६) रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास मरकळ येथील आळंदी रोडवर जगतगुरू हॉस्पीटल समोर घडली. फिर्यादी संतोश रामकृष्ण हिंगणकर यांनी आरोपी कंटेनरवरील चालक निन्हकु उदयराज बिंद याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
आळंदी पोलिसांनी २६१/२०२३ भा.द.वि.क ३०४अ, २७९, ३३८, मो वा का क १८४ अन्वये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जोंधळे पुढील तपास करीत आहेत.