न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० मोरवाडी येथे “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पिंपरी विधानसभा युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार हिंगे, तसेच दिव्यांग प्रकोष्टचे अध्यक्ष शिवदास हांडे यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजिका व पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या कार्यकारणी सदस्य रोहिणी रासकर यांनी प्रास्तविक केले.
तुषार हिंगे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला पंकज दलाल, प्रशांत शिंदे, धरम वाघमारे, राकेश सिंग, राम भसवणे, माडगूळकर व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थीत होता. आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.












