न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्याषी प्रमाणे २०२३ या वर्षी देखील मूर्ती दान हा संकल्प घेण्यात आला होता. यामध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन मा. विरोधी पक्षनेते नाना काटे आणि मा. नगरसेविका शितल काटे यांच्या वतीने करण्यात आले होते.
मागील ५ वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे. दीड दिवसांचे ते १० दिवसांच्या गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित न करता या उपक्रमांतर्गत पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर गणेशभक्तांकडून घरगुती व सार्वजनिक अशा एकूण १३ हजार ७०० मूर्तीचे दान करण्यात आल्या.
मागील वर्षी २०२२ या उपक्रमात १० हजाराहून जास्त गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. मूर्ती संकलन करण्याचे काम श्री फाउडेशन यांचा वतीने करण्यात आले. नाना काटे सोशल फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी, विविध संस्थाच्या स्वयंसेवकांनीही सहकार्य केले.












