- पिं.चिं. अॅडव्होकेट्स बार असोसिएशन आणि लोकमान्य हॉस्पिटलचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन व लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिराचा शंभरपेक्षा अधिक वकील, न्यायाधीश वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांनी लाभ घेतला.

वकिली व्यवसाय हा अत्यंत ताणतणावाचा असल्याने वकील वर्गाला मोठ्या मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. परिणामी वकिलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. याचीच दखल घेऊन बार असोसिएशनतर्फे सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराचा १०० पेक्षा जास्त वकिल बंधू व भगिनी, न्यायाधीश वर्ग, न्यायालयीन कर्मचारी यांनी लाभ घेतला. यावेळी रक्तदाब, शुगर, हृदयरोग, हाडांचे आजार, पोटाचे आजार अशा १५ पेक्षा जास्त आजारांवर मार्गदर्शन तसेच चाचण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी वकिलांना मोफत उपचार व मार्गदर्शन केले.
अॅड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ अध्यक्षस्थानी तर, प्रमुख पाहुणे म्हणून बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे होते. बार असोसिएशनतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोकमान्य हॉस्पिटलच्या व्यवस्थापक डॉ. अर्चना कुडे व डॉ. आशितोषकुमार दुबे यांचा कमिटीतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लोकमान्य हॉस्पिटलच्या सर्व सहकारी स्टाफला कमिटीतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष अॅड. जयश्री कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, सहसचिव अॅड. मंगेश नढे, खजिनदार अॅड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटरस अॅड. राजेश रणपिसे, अॅड. सौरभ जगताप, अॅड. प्रशांत बचूटे, अॅड. नितिन पवार, अॅड. पवन गायकवाड व इतर वकील बंधू भगिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व संयोजन अॅड. मंगेश नढे यांनी केले. आभार अॅड. विश्वेश्वर काळजे यांनी मानले.















