- ‘महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२३’ पुरस्कार मुबंईत प्रदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२३) :- ‘ह्युमन राई्स मिरर आणि विश्व’ या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानासाठी नुकतेच मुबंईतील कोर्टयार्ड मॅरीटमध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते कु. प्रतिक्षा सुभाष डफळ यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र एक्सलेन्स अवॉर्ड 2023-बेस्ट सेल्फ डिफेन्स ट्रेनर आणि मोटिवेशनल स्पीकर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल, रोशनी कपूर, विश्व मेडिकल ऍडमिशन पॉईंटचे संचालक प्रसाद कमलाकर, आयआयबीएम कॉलेज पुणे विभागप्रमुख अमोल भागवत, सुभाष डफळ, वृषाली सुभाष डफळ, कु. आरोही सुभाष डफळ तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून कु. प्रतिक्षा या बालवयीन आणि किशोरवयीन विद्यार्थिनींच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना सामोरे कसे गेले पाहिजे? यासाठी स्वसंरक्षणाचे धडे, प्रात्यक्षिके तसेच मार्गदर्शन करीत आहेत. गेल्या सात वर्षांपासून आयआयबीएम, पुणे या संस्थेमध्ये प्रशासकीय प्रमुख त्या म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातच अष्टपैलू मार्गदर्शनाचे धडे देऊन त्यांना करिअरसाठी परदेशापर्यंत पोहचवण्याचे उल्लेखनीय कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या याच कार्याची दखल ह्युमन राईट मिरर आणि विश्व या संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
प्रतिक्षा डफळ यांना मागील काही वर्षात लेडी सिंघम, आदर्श पोलीस नागरिक, बेस्ट को-ऑर्डिनेटर, बेस्ट लीडरशिप, बेस्ट मॅनेजमेंट आणि एकनिष्ठता अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींकडून प्रतिक्षा डफळ यांचे कौतुक होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.












