- वीजवाहिन्या भूमिगत करा; दिनेश यादव यांची महावितरणकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२३) :- कुदळवाडी येथील सेक्टर १६ ते चिखली मार्गावरील विजवाहिनी तुटल्याने रविवारी सकाळी सात वाजता एका तरुणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे.
मागील अनेक वर्षापासून येथील विजवाहिन्या तुटत आहेत. वारंवार तक्रारी करून देखील महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहेत. आज अखेर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हकनाक एका कुटुंबातील कर्त्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.
याला सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला महावितरणकडून तात्काळ मदत मिळावी. कुदळवाडीतील सर्व भागातील विजवाहिनी त्वरित भूमिगत करावी अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मा. स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महावितरणाच्या भोसरी विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.












